in

Anil Deshmukh | अनिल देशमुखांचे दोन्ही स्वीय्य सहाय्यक ‘ईडी’च्या कोठडीत

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि पीएस संजीव पालांडे यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती. या दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 1 जुलैपर्यंत ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने दोघांविरोधात ही कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज (26 जून) सकाळी अकरा वाजता त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अनिल देशमुख यांच्यावरही ईडी कारवाई करु शकते, असं समजतं.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. ज्यावेळी याबाबत चर्चा सुरु होती, तेव्हा त्या खोलीत अनिल देशमुख यांच्यासह त्यांचे पर्सनल सेक्रेटरी संजीव पालांडे देखील उपस्थित होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Corona Update | राज्यात ९ हजार ८१२ नव्या रुग्णांची नोंद

भारतीय जनता पार्टीचे आंदोलन फसवे – बाळासाहेब थोरात