in ,

जर ईडी निष्पक्षपातीपणे तपास करणार असेल, तर…; अनिल देशमुखांनी सांगितलं चौकशीला न येण्याचं कारण

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख पैशांच्या गैरव्यवहाराप्रकरणी अद्याप ते चौकशीसाठी ईडीसमोर हजर झालेले नाहीत. देशमुख यांनी नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाला ते चौकशीसाठी हजर का राहत नाहीत, याचं कारण सांगितलंय.

“ईडीने माझ्या विरुद्ध सुरू केलेल्या कारवाईपासून मी पळत असल्याची धारणा फार चुकीची आहे. या प्रकरणात जर ईडी निष्पक्षपातीपणे तपास करणार असेल, तर मी तपासात सहकार्य करण्यास तयार आहे,” असं त्यांनी न्यायालयाला सांगितलं आहे.

देशमुखांचे वकील विक्रम चौधरी यांनी युक्तिवाद मांडत सांगीतले, कोणताही वैयक्तिक हेतू नसणाऱ्या अधिकाऱ्यांकडून देशमुखांची चौकशी व्हावी. चौधरींना न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक वाटत असल्याचं सांगत देशमुखांना जबरदस्तीच्या कारवाईपासून सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. देशमुखांवर सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचा आरोप चौधरींनी केला आहे. माध्यमे सुद्धा निवडक खुलासे करत असल्याचा त्यांचा आरोप आहे.

श्री साई शिक्षण संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार आणि परंबीर सिंग यांच्या कडे १०० कोटींची लाच मागितल्या प्रकरणी ईडी आणि सीबीआयने अनिल देशमुखांवर कारवाई चालू केली होती. सिंग यांनी आठ पानी आरोप पत्रात देशमुखांनी त्यांना अवैध बार आणि हॉटेल मालकांकडून दरमहा १०० कोटी जमा करण्याचे आदेश दिले होते. तर देशमुखांच्या मते हे आरोप सिंग यांच्या निलंबनानंतर झाल्यामुळे ते बीनबुडाचे आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अक्षय कुमारने पूर्ण केले ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचे चित्रीकरण

आर्थिक विवंचनेतून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या