in

मुंबईतील ब्लॅक आऊट हा घातपात – गृहमंत्री अनिल देशमुख

मागील वर्षी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत झालेल्या ब्लॅक आऊट घटनेमागे चीनचाच हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. या प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी १२ ऑक्टोबर रोजी मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले होते. प्राथमिक माहितीनुसार मुंबईवर सायबर हल्ल्याचे संकेत नाकारता येत नाहीत. या संबधित अधिक चौकशी केली जात आहे. महाराष्ट्र सायबर गुन्हे समितीने या संबधित अहवाल सदर केल आहे. या संदर्भात काही पुरावे मिळाले आहे. राज्य सरकाने गंभीरपणे नोंद घेतली आहे.

‘मुंबई अंधारात गेली होती, मुंबईतील वीजपुरवठा अचानक खंडीत झाला होता. त्यावेळी, मी घातपात असल्याचे सुचवले होते. पण, अनेकांनी मला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की, तो घातपातच होता. या संदर्भात अधिक माहिती अधिवेशनात दिली जाईल.” असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

सायबर सेलच्या अहवालातील गंभीर खुलासे

१) १४ ट्रोजन हॉर्सेस एमएसईबी मुंबईच्या प्रणालीमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाला.
२) ८ जीबी डाटा बाहेरच्या सर्व्हरमधून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर झालेला असू शकतो.
३) ब्लॅकलिस्टेड आयपी अ‍ॅड्रेसवरून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न झालेला असू शकतो.

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भारत आणि चीनमधले द्वीपक्षीय संबंध ताणले गेले होते. दोन्ही देशांच्या सीमारेषेवर असलेल्या गलवान प्रांतामध्ये भारतीय जवान आणि चीनी सैनिकांमध्ये झटापट झाली होती. याच काळामध्ये १२ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अनेक भागांमधली वीज दिवसभरासाठी गायब झाली होती.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“मुलाच्या मतदारसंघात ‘पावरी’ होतेय”, नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

अभिनेत्री कंगना रणौत विरोधात अटक वॉरंट