लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटी ट्वीट प्रकरणी कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर त्याचप्रमाणे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावांची चर्चा होती. मात्र माझ्या बोलण्याचा विपर्यास केल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला आहे. सेलिब्रिटीजची चौकशी करा, असे माझे आदेश नव्हते. या प्रकरणात भाजपा आयटी सेलचा सहभाग असल्याची शक्यता वाटल्याने त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते, असे देशमुख म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणात भाजपाच्या आयटी सेलचा प्रमुख आणि अन्य १२ इन्फ्लुएन्सरचा समावेश असल्याचे महाराष्ट्र पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानुसारच पोलीस कार्यवाही करत आहेत, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
मागील दोन महिन्यांहून जास्त वेळ सुरू असलेल्या दिल्लीती शेतकरी आंदोलनासंदर्भात अनेक सेलिब्रिटीजने ट्वीट केले. यामध्ये सचिन तेंडुलकर तसेच लता मंगेशकर यांचा समावेश होता. या सर्व सेलिब्रिटींना भाजपाच्या नेत्यांनी ट्वीट करायला लावले, असा आरोप होत आहे. अनेकांच्या ट्वीटमधील आशय सारखा असल्याने ट्वीट वॉर रंगले होते. हे सर्व प्रकरण स्क्रिप्टेड असल्याचा संशय गृहमंत्रालयाला आल्याने अखेर पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख तसेच अन्य काही जणांवर कारवाई होणार असल्याची महिती समोर आली आहे. या प्रकरणी अनिल देशमुख यांनी संकेत दिलेत.
Comments
Loading…