in

एजाज पटेलचा दस का दम, अनिल कुंबळेनं केलं ट्वीट

न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने आज एका डावात १० विकेट घेतल्या. या कामगिरीनंतर एजाजने १० बळी घेत कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी साधली. एजाजच्या या पराक्रमानंतर अनिल कुंबळेने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कुंबळेने ट्वीट करत एजाजचे अभिनंदन केले. तो म्हणाला. ”एजाज तुझं क्लबमध्ये स्वागत आहे. पर्फेक्ट १०. कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी अशी कामगिरी साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.” १९९९मध्ये अनिल कुंबळेने (२६.३-९-७४-१०) पाकिस्तानविरुद्ध १० बळी मिळवले होते.

भारताचा दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेने पाकिस्तानविरुद्ध एका डावात १० विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीनंतर कोणी अशी कामगिरी करेल, असे क्वचितच वाटत होते.. पण आज न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने ही किमया केली आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत एजाजने १० बळी घेत कुंबळेच्या विक्रमाची बरोबरी साधली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs NZ 2nd Test Day 2 Live | भारतीय गोलंदाजांची कमाल; 33 धावात गुंडाळले 5 विकेट

IND vs NZ 2nd TEST : न्यूझीलंडचा संघ ६२ धावावर गारद,