in

ST Employee Strike | …तर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे लागेल; अनिल परब यांचा इशारा

संपाचा तिढाच असाच कायम राहीला तर निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत घ्यावे लागेल असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे.तसेच कर्मचारी कामावर आले नाही तर कारवाईचा बडगा उचलावाचं लागेल असेही ते म्हणाले.

परिवहन मंत्री अनिल परब आणि कामगार संघटनांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे. एसटी कामगारांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या प्रमुख मुद्द्यावर या बैठकीत चर्चा झाली. यानंतर परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत वरिल इशारा दिला.

सरकारनं घवघवीत पगारवाढ दिलीय, आता संप मागे घ्या. सर्व कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असे आवाहन अनिल परब यांनी यावेळी केले. कोर्टाच्या समीतीच्या अहवालानंतर विलीनीकरणावर चर्चा करू असेही त्यांनी म्हटले.

कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगावर देखील विचार करणार आहोत असेही परब म्हणाले आहेत. त्याचसोबत कोणत्याही कामगारावर कारवाई होणार नाही, मात्र बेशिस्ती खपवून घेतली जाणार नाही. कर्मचारी कामावर आले नाही तर कारवाईचा बडगा उचलावाच लागेल. संपाचा तिढाच असाच राहीला तर वेगवेगळे पर्याय वापरावे लागतील त्यातील एक पर्याय म्हणजे निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा विचार करणार असे परब म्हणाले आहेत.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उल्हासनगर महापालिकेचा अनधिकृत मच्छी मार्केटवर हातोडा

राष्ट्रवादीच्या गुलाबराव देवकरांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा मार्ग मोकळा