in

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरण : पोलिसांवर विश्वास नाही का, अनिल परब यांचा फडणवीसांना सवाल

अॅन्टिलिया स्फोटक प्रकरणाच्या तपासावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. ज्या गाडीमध्ये ही स्फोटके सापडली, त्या गाडीच्या मालकाचा मृतदेह आज (5 मार्च) सापडला. त्यामुळे या सर्व प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का? असा सवाल संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी फडणवीसांना केला आहे.

अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली गाडी मनसुख हिरेन यांची नसून त्यांच्या गॅरेजमध्ये ती कार सॅम पीटर न्यूटन यांनी कामाकरिता दिली होती. मात्र त्याचे पण पैसे न मिळाल्याने हिरेन यांनी ती गाडी आपल्याकडे ठेवून घेतली होती, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मात्र पोलीस रेकॉर्डवर या गाडीचे मालक हिरेन असल्याची नोंद आहे, असे फडणवीस यांनी निदर्शनास आणून दिले.

त्यावर संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी मात्र फडणवीस यांचे म्हणणे फेटाळले. अशा प्रकरणात व्यक्ती खरे बोलते असे मानणे गरजेचे नाही. पोलिसांना या प्रकरणाचा तपास करू द्या. त्यांना थोडा वेळ द्या. तसेच त्यांच्यावर विश्वासही ठेवा, असे ते म्हणाले.

वाझे रडारवर
अॅन्टिलिया येथे ही गाडी सापडली तेव्हा, पोलीस अधिकारी सचिन वाझे तिथे सर्वात आधी कसे पोहोचले? ते आधीपासून हिरेन यांच्या संपर्कात होते, असा दावा फडणवीस यांनी केला. त्यावर अनिल देशमुख यांनी, ज्येष्ठ पत्रकार अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यासाठी गेले होते, यामुळे प्रश्न उपस्थित करीत आहात का, असा सवाल केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवेंद्र फडणवीसांवर तृतीयपंथीयाशी संबंध असल्याचा आरोप; आरोपीवर तडीपाराची कारवाई

कोरोनाचा उद्रेक; रुग्णसंख्या 10 हजाराच्या पल्ल्याआड