in

महाराष्ट्र सदन घोटळाप्रकरणात अंजली दमानियांची उच्च न्यायालयात धाव

कथित महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मंत्री छगन भुजबळ यांची डोकेदुखी पुन्हा एकदा वाढणार आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (एसीबी) विशेष न्यायालयाने या प्रकरणात छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), त्यांचे कुटुंबीय आणि व्यावसायिक चमणकर यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी आता या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात अंजली दमानिया यांच्या जनहित याचिकेनंतर गुन्हा दाखल होऊन विशेष न्यायालयात खटला चालला होता. आता पुन्हा एकदा अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ यांना न्यायालयात खेचले आहे.

महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या महाराष्ट्र सदन कथित घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता. आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. यानंतर अंजली दमानिया यांनी हायकोर्टात जाणार असल्याचं सांगितलं होतं.

अंजली दमानियांचं ट्वीट –
छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला भ्रष्टाचार विरोधी कार्यालयाने आव्हान दिलं नसल्याने एक कार्यकर्ता म्हणून माझी जबाबदारी आहे. मी मुंबई उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाने महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्तता केल्याच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Miss Maharashtra | शेतकरी कन्येला मानाचा मुकूट, ‘खाकी’तली सौंदर्यवतीचे पाहा फोटो

BWF UNDER-19 | तस्नीम मीरने घडवला इतिहास