in

अंकुश चौधरी लवकरच छोट्या पडद्यावर..

मोठ्या पडद्यावर काम करताना देखील कलाकारांना छोट्या पडद्याचे आकर्षण असतेच. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी, त्याबरोबरच मराठीत देखील प्रसाद ओक, सई ताम्हणकर, स्वप्निल जोशी हे देखील छोट्या पडद्यावर दिसत आहेत. आता या यादीमध्ये अंकुश चौधरीचही नाव समविष्ट होणार आहे.

‘मी होणार सुपरस्टार’ या स्टार प्रवाह वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या डान्स रियालटी शोच्या निमित्ताने छोट्या पडद्यावर पुनरागम करत आहे. या कार्यक्रमात अंकुश चौधरी परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा कार्यक्रम २१ ऑगस्टपासून प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातील नृत्यकलाकारांना त्यांचे टॅलेंट दाखवण्यासाठी एक मोठे व्यासपीठ मिळणार आहे.

याबद्दल अंकुशने सांगितले की, ‘ या रिअॅलिटी शोच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. त्यामुळे मी खूप जास्त उत्साहित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधता येणार असल्याने मी कमालीचा उत्सुक आहे. हा कार्यक्रम प्रेक्षकांना नक्की आवडेल असा मला विश्वास आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रेयस तळपदे छोट्या पडद्यावर कमबॅक करणार… प्रोमो लॅांच.

राज्यात 10 दिवसांत पाणी साठ्यात 18 टक्के वाढ!