in

कृषी कायद्यांना विरोध : केंद्र सरकार आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी करण्याची अण्णांची तयारी

लोकशाही न्यूज नेटवर्क

नव्या कृषी कायद्यांना विरोध दर्शवत शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू केले. गेले सुमारे दोन महिने दिल्लीच्या वेशीवर हे आंदोलन सुरू होते. पण आज, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीला हिंसक वळण लागले. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे.
दिल्लीच्या वेशीवर शेतकऱ्यांचे 60 दिवस आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारबरोबर चर्चेच्या 11 फेऱ्या झाल्या आहेत. पण अद्याप तोडगा निघालेला नाही. नवे कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. याशिवाय, किमान आधारभूत किंमत (एमएसपी) कायद्याच्या कक्षेत आणण्याची मागणी देखील त्यांची आहे. हे नवे कायदे दीड वर्षासाठी स्थगिन करून एका समितीच्या मार्फत हा तिढा सोडवण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आंदोलक शेतकऱ्यांसमोर ठेवला होता. पण हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडावला आहे.
त्यातच आता अण्णा हजारे यांनी हा तिढा सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार आपलेच आहेत. त्यामुळे आपण शिष्टाई करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आंदोलन हे शांततेच्या मार्गानेच झाले पाहिजे. हिंसेचे गालबोट लागले म्हणजे आंदोलन बदनाम होते. आज दिल्लीत जो हिंसाचार घडला तो खूप क्लेशदायक होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नवी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण अन् कंगना पुन्हा बरळली…

ट्रॅक्टर रॅली : हिंसेमागे मोठे राजकारण…, शेतकरी संघटनांचा आरोप