in

संतापजनक | पोलिसांनी मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले

जळगाव येथील शासकीय आशादीप महिला वसतिगृह येथे संतापजनक प्रकार घडला. काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले. ज्या मुलींनी विरोध केला त्यांना या धक्कादायक कृतीसाठी भाग पाडण्यात आले. सामाजिक संघटनांनी या घटनेला वाचा फोडली. जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणात तक्रार झाली. घटनेचा व्हिडीओ सादर झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी चौकशी करण्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले.

शासकीय आशादीप महिला वसतिगृह येथे १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी आणि बाहेरून आलेल्या पुरुषांनी मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास सांगितले. ज्या मुलींनी विरोध केला त्यांना या धक्कादायक कृतीसाठी भाग पाडण्यात आले. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पोलीस चौकशीचे निमित्त करुन निवडक पोलीस आणि बाहेरील पुरुषांना वसतिगृहात प्रवेश देण्यात आला. यानंतर धक्कादायक प्रकार घडला होता. या प्रकरणात तक्रार करणाऱ्या करणारी मुली आणि महिलांवर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पण जननायक फाउंडेशनच्या सदस्यांसमोर वसतिगृहाच्या कर्मचाऱ्यांना जास्त दमदाटी करणे शक्य झाले नाही. अखेर निवडक मुली आणि महिलांच्या धाडसामुळे गैरप्रकाराला वाचा फुटली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

MBBS Exam | एमबीबीएस अंतिम वर्ष परीक्षा होणार ऑफलाईन

Maharashtra budget session | फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीची चौकशी होणार!