लोकशाही न्यूज नेटवर्क
जालना तालुक्यातील जामवाडी शिवारातल्या त्या विहिरीत पुन्हा एक गाडी कोसळल्याची घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी या विहिरीत ब्रिझा कार कोसळून दोघांचा मृत्यू झाला होता. आज सकाळी पुन्हा एक कार या विहिरीत कोसळली आहे.
औरंगाबाद येथील पाच जण आय 20 कारमधून शेगावला जात होते. दरम्यान जामवाडीजवळ ट्रकनं हुलकावनी दिल्यानं कार थेट विहिरीत कोसळली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. यात तिघांना वाचवण्यात यश आले, मात्र एक महिला आणि एक मुलगी बुडाल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. या घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.
Comments
Loading…