in

अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू प्राप्तिकर विभागाच्या रडारवर

आयकर चोरी केल्या प्रकरणी सध्या दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नूवर प्राप्तिकर विभागानं कार्यवाही सुरू केली आहे. अनुराग व तापसीसह फँटम फिल्म प्रॉडक्शन हाऊसशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या मालमत्तांवर आयकर विभागाच्या पथकांनी छापेमारी केली. सूत्रांना नुसार बुधवारी (३ मार्च) रात्री उशिरापर्यंत पुण्यात अनुराग आणि तापसीची चौकशी करण्यात आली आहे.

फँटम फिल्मशी संबंधित सेलिब्रेटींच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापे टाकले. मुंबई, पुण्यासह एकूण २२ ठिकाणी छापे टाकले. यात फँटम फिल्मसह टॅलेंट मॅनेजमेंट कंपनी कार्यालयावरही आयकरने धाड टाकली. काल दुपारपासून आयकरचे पथक या मालमत्तांची आणि कर चोरी प्रकरणाचा तपास करत आहेत. सूत्रांच्या मते, झालेला नफा आणि त्यांनी भरलेला आयकर परतावा याच्यात आयकर विभागाला तफावत आढळून असून, पुढील तीन दिवस झाडाझडती सुरूच राहणार आहे. सरकारविरोधात भूमिका घेतल्यामुळेच अनुराग आणि तापसीवर आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याचं काँग्रेससह विरोधी पक्षातील नेत्यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबई बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे काम बंद आंदोलन

Maharashtra budget session | “पाठ थोपटून घ्यायलाही काम करणारी छाती हवी”