in

अंत्यविधी आटोपून आलेल्यांवर काळाचा घाला; ॲपे रिक्षा – हायवा गाडीच्या अपघातात पाच जण जागीच ठार

संदीप जेजूरकर, लासलगाव ( नाशिक ) | नाशिकच्या लासलगावमध्ये अंत्यविधी आटोपून आलेल्यांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. ॲपे रिक्षा – हायवा गाडीत समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याची घटना घडली.

लासलगावहुन विंचूरच्या दिशेने पाच जणांना घेऊन जाणारी ॲपे रिक्षा विंचूरहून लासलगावच्या दिशेने  निघालेल्या हायवाची जोरदार धडक झाली. लासलगाव – विंचूर रोड वरील मंजुळा पॅलेस समोर सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घटना घडली. या ॲपे रिक्षाला झालेल्या अपघातात मृतांमध्ये रिक्षा चालक सुहास मनोहर निकाळे ( वय – ४० ) रा.विंचूर, विठ्ठल बाजीराव भापकर ( वय – ६५ ) रा.लोणी  प्रवरा, भाऊसाहेब बाळासाहेब नागरे ( वय – ६० ) रा.लोणी प्रवरा, किसनदास बैरागी ( वय – ६० ) रा.धारणगाव खडक, रतन पवार ( वय – ४० ) रा. विंचूर यांचा समावेश आहे. यातील दोन प्रवाशी हे लोणी प्रवरा येथून लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे अंत्यविधीसाठी आलेले होते.अंत्यविधी आटोपल्यानंतर आपल्या गावी जाण्यासाठी ते विंचूरला रिक्षाने जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खड्डेमुक्त रस्त्यांसाठी टास्क फोर्सची नियुक्ती; एकनाथ शिंदेंची घोषणा

बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सच दुकान लूटले; घटना सीसीटीव्हीत कैद