in

माफी मागा, संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांना कायदेशीर नोटीस

काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले असून. हा वाद आणखी विकोपाला जाण्याची चिन्हे दिसत आहे. एका प्रकरणात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना वकिलांमार्फत नोटिस पाठवली. माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील दिला आहे.

संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केलेल्या टीकेवर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र संजय राऊत यांना पाठवले होते. पत्रात त्यांनी पीएमसी बँक घोटाळ्याबाबत भाष्य केल असून. त्यावरुन संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. संजय राऊत यांनी एक ट्वीट केल आहे.त्या ट्वीमध्ये संजय राऊत म्हणतात, माझ्या आणि माझ्या पत्नीविरोधात बदनामीकारक, निराधार आणि बोगस टिपण्णा केल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांना मी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. जर चंद्रकांत पाटील यांनी बिनशर्त माफी मागितली नाही, तर मी पुढील कायदेशीर कारवाई करेन आणि न्यायालयात जाणार, असं संजय राऊत यांनी म्हटले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रेल्वेत महिलेची छेड काढल्याप्रकरणी NCB चा बडा अधिकारी अटकेत

तुम्ही चोऱ्या करता म्हणून धाडी पडतात, रावसाहेब दानवेंचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र