in ,

लवकर कोरोना लस घ्या; विराट कोहलीचं लस घेतल्यानंतर आवाहन

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानं सोमवारी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू कोरोना लसीचा पहिला डोस घेत आहेत. शिखर धवन, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा यांच्यापाठोपाठ विराटनंही पहिला डोस घेतला. त्यानं इतरांनाही शक्य तितक्या लवकर ही लस घ्या, असे आवाहन केलं आहे. कोरोना लढ्यात विराटही मैदानावर उतरला आहे. त्यानं पत्नी अनुष्का शर्मा व Kettoसह 7 कोटींचा निधी गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. यात विराट-अनुष्कानं दोन कोटींची मदतही केली आहे.

विराट कोहली व अनुष्का शर्मा यांनी कोरोना लढ्यात सहभाग घेण्यासाठी सुरू केलेल्या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले आहे आणि २४ तासांहून कमी कालावधीत त्यांनी ३.६ कोटी रक्कम जमाही केली आहे. यातील २ कोटी रक्कम ही विराट-अनुष्का यांनी दान केली आहे. या मोहिमेला मिळलाले प्रतिसाद पाहून विराट व अनुष्का यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. Ketto यांच्यासोबत मिळून ही दोघं निधी गोळा करत आहेत आणि त्यातील प्रत्येक रक्कम ही कोरोना लढ्यासाठी वापरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने घेतली कोरोनाची लस

Congress President Election | काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचा मुहूर्त ठरला….