in

दहावीच्या परीक्षेचे अर्ज भरता येणार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच दहावी बोर्ड परीक्षेचा अर्ज गुरुवारपासून (१८ नोव्हेंबर) www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दाखल करता येणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

सदर परीक्षेस नियमित, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार व तुरळक विषय, आयटीआय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. यामध्ये माध्यमिक शाळांनी नियमित विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म SARAL डाटाबेसवरून नियमित शुल्कासह १८ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२१ या कालावधीत भरावयाची आहेत.

माध्यमिक शाळांनी पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, आयटीआयद्वारे ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांची परीक्षा फॉर्म प्रचलित पद्धतीप्रमाणे १० ते २० डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘अनिल देशमुखांच्या तपासात राज्याचा अडथळा’, सीबीआयचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

Weather update | पुढील तीन दिवस राज्यात जोरदार पाऊस