in

देवेंद्र फडणवीस म्हणतात, लॉकडाऊन नाही, तर ‘हा’च कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय!

कोरोना विषाणूची दुसरी लाट राज्यात आली असून कोरोना रुग्णांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. चाचण्यांची संख्या अधिक असल्याने इतकी संख्या दिसत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. याची प्रशंसा करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हेच सूत्र कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

कोरोना रुग्ण शोधून काढण्यासाठी आम्ही दररोज सव्वालाख चाचण्या करत आहोत. त्यात आरटीपीसीआर टेस्टची संख्या जास्त आहे. कारण त्यात अचूकता आहे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी अलीकडेच सांगितले होते. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या 10 दिवसांत सरासरी 1,26,950 चाचण्या दररोज होत आहेत. आता तरी हे सूत्र कायम ठेवा! येणार्‍या काळात चाचण्यांची संख्या आणखी वाढवून राज्याची पूर्ण क्षमता वापरली गेली पाहिजे. लॉकडाऊन नाही, तर ‘टेस्ट, ट्रेस अँड ट्रीट’ हाच कोरोना रोखण्याचा प्रभावी उपाय होय, असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

अधिकाधिक 90 हजारांपर्यंत आणि तेही फारच थोडके दिवस! चाचण्या वाढवा, तोच कोरोना रोखण्याचा उत्तम मार्ग आहे, हे वारंवार सांगूनही न ऐकणार्‍या मविआ शासनाला अखेर सुबुद्धी झाली. दैनंदिन चाचण्या 1 लाखांवर जाण्यासाठी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची वाट महाराष्ट्राला पहावी लागली, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दीपाली चव्हाण आत्महत्या : आमदार रवी राणा यांच्या पत्राकडे तत्कालीन वनमंत्र्यांनी केले दुर्लक्ष

पुढच्या जन्मी आपण नव्याने सुरुवात करू… मृत्यूपूर्वी दीपाली चव्हाण यांचे पतीला भावनिक पत्र