in ,

लवकरच येणार फरहान अख्तरचा ‘तुफान’

फरहान अख्तरचा बहुचर्चित ‘तुफान’ हा चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जूची कहाणी आहे.भाग मिल्खा भाग या चित्रपटातील फरहानच्या दमदार कामगिरी आणि यशस्वी भागीदारीनंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी ‘तुफान’ या चित्रपटामधून पुन्हा एकदा एकत्र आली आहे.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि एक्सेल एंटरटेनमेंट आणि आरओएमपी पिक्चर्स यांची निर्मिती असलेला ‘तुफान’ हा या वर्षातील सर्वात भव्य स्पोर्ट्स ड्रामा ठरणार आहे. तर भारत आणि जगभरातील २४० हून अधिक देश आणि प्रांतांमधील चाहत्यांना हा अत्यंत रंजक चित्रपट १६ जुलैपासून अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर पाहता येईल.मुंबईतील डोंगरी भागात मोठा होऊन स्थानिक गुंड झालेल्या अज्जू या अनाथ मुलाची ही प्रेरणादायी कहाणी आहे. अनन्या या हुशार, प्रेमळ मुलीला भेटल्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. तिचा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्यामुळेच त्याला स्वत:ची वेगळी ओळख शोधण्याची जिद्द लाभते. या जिद्दीतूनच अजीज अली हा बॉक्सिंग चॅम्पियन होण्याचा प्रवास यात चितारला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

चंद्रपूर जिल्ह्यात गांजा माफियांना अटक

400 फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकल्याने वाचले तिघांचे प्राण