in ,

क्रांती रेडकरला आरोह वेलणकरचा पाठिंबा; पहिला मराठी अभिनेता

आर्यन खान प्रकरणामुळे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे नवाब मलिक चांगलेच चर्चेत आले आहेत. नंतर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने पत्रकार परिषद घेतली वानखेडेवरील सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हणत नवाब मलिक यांना चांगलचं प्रतिउत्तर दिल आहे. अशातच अभिनेता आरोह वेलणकर यांनी हाच प्रश्न उपस्थित करत क्रांतीला सोशल मीडियावरून जाहीर पाठींबा दिला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा जन्मदाखला आणि पहिल्या लग्नाचा फोटो पोस्ट केल्या नंतर क्रांतीने म्हटले “आज काल बायका पण असं वागत नाहीत. हे किचनमधील पॉलिटिक्स, चोमडेपणा केल्यासारखं आहे.” असं प्रतिउत्तर दिलं. क्रांतीने सांगितले मला महाराष्ट्रासह देशभरातून समर्थनाचे मेसेज येत आहेत. आरोह वेलणकरने एक ट्वीट केलं आहे आणि अभिनेता आरोह वेलणकर यांनी हाच प्रश्न उपस्थित करत क्रांतीला सोशल मीडियावरून जाहीर पाठींबा दिला आहे. आरोहने म्हटल “क्रांती मला खरंच आश्चर्य वाटतंय की आपल्या मराठी इंडस्ट्रीमधील एकही मित्र तुझ्या पाठींब्यासाठी उघडपणे समोर आलेला नाही. सोशल मीडियावरून सुरु असलेली तुझ्या कुटुंबाविरोधातील ही पीआर मोहीम अस्वस्थ करणारी आहे. मला माहित आहे आपण खूप चांगले मित्र नाही फक्त ओळखीचे आहोत. मात्र तरीही माझा तुला पूर्ण पाठिंबा आहे.” अस ट्वीट आरोहने क्रांतीला पाठिंबा देत केल आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Prabhakar Sail | प्रभाकर साईल यांना एनसीबीकडून समन्स

एनसीबीचे पथक आज मुंबईत; समीर वानखेडेंवरच्या आरोपांची चौकशी होणार?