in

अभिनेत्री कंगना रणौत विरोधात अटक वॉरंट

लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात गैरहजर राहिल्याने मुंबईच्या न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत विरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. समन्स बजावूनही कंगना रणौत कोर्टात हजर न राहिल्याने हा वॉरंट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत वाढ होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गीतकार जावेद अख्तर यांच्या तक्रारीनंतर मुंबईच्या एका कोर्टाने अभिनेत्री कंगना रणौत यांना समन्स बजावला होता. तत्पूर्वी जावेद अख्तर मानहानी प्रकरणाचा तपास करणं आवश्यक असल्याचं मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितलं होतं. परंतु समन्स बजावूनही कंगना चौकशीसाठी हजर राहिली नाही.

या संदर्भात कंगनाने अटक वॉरंट बातमी ट्वीट करत त्या ट्वीटला ‘सर्व गिधाडांच्या झुंडीसमोर एकटी वाघीन आहे, मजा येईल’ अशा आशयाचं कॅप्शन दिले आहे.

जावेद अख्तर हे याप्रकरणाच्या सुनावणीसाठी आपल्या वकिलासोबत न्यायालयात हजर झाले होते. मात्र कंगना या सुनावणीसाठी न्यालयानात आली नाही. यावरच कडक पावले उचलत महानगरदंडाधिकाऱ्यांनी कंगनाविरोधात जामीनात्र वॉरंट जारी केले आहे.

काय आहे प्रकरण?
सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणात कंगनाने रिपब्लिक टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत जावेद अख्तर यांचा उल्लेख केला होता. यामध्ये तिने एका बॉलीवूड सुपरस्टारसोबतच्या वादावरून जावेद यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केली. मात्र या प्रकरणात माझा काहीही संबंध नसताना कंगनाने माझ्यावर खोटे आरोप केले आहेत, समाजातील प्रतिमा मलीन करण्याचा आरोप अख्तर यांनी कंगनावर ठेवण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईतील ब्लॅक आऊट हा घातपात – गृहमंत्री अनिल देशमुख

नाशिक मनपा हद्दीतील शाळा पुन्हा बंद