in

शहीद दौडचे सातारा जिल्ह्यात आगमन

प्रशांत जगताप, सातारा | 26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ शहीद अशोक कामटे स्मृती फौंडेशन मार्फत सांगली ते मुंबई अशी शहीद मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली आहे.. सांगलीपासून या दौडीस सुरुवात झाली आहे..

26/11 रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या स्मरणार्थ ही शहीद आयोजित करण्यात आली आहे.सांगली ,कराड, सातारा आणि मुंबई अशी जवळपास चारशे पन्नास किलोमीटर अंतर पार करून ही शहीद दौड 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत दाखल होणार आहे..मुंबई येथे 26 तारखेला आझाद मैदानावर या दौडची सांगता होणार आहे.साताऱ्यात दौड आल्यावर जिल्हा पोलीस मुख्यालय येथे शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले.दौड साताऱ्यात येताच नागरिकांनी स्वागत केलं.. या दौडमध्ये शेकडो लोक सहभागी झाले आहेत.वंदे मातरम.. भारत माता की जय. जय भवानी जय शिवाजी च्या जयघोषात ही दौड मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सिल्लोडमध्ये लसीकरणासाठी ‘हर घर दस्तक’ अभियान

परमबीर सिंह यांची तब्बल 7 तास चौकशी,उद्या पुन्हा चौकशीची शक्यता ?