in

आर्वीत स्त्री रोग तज्ञ महिलेला अटक, अल्पवयीन मुलीचा गर्भपात

भूपेश बारंगे | वर्ध्यात आर्वी येथे १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी सोमवारी सकाळी रीतसर महिला डॉक्टरला अटक केली. अल्पवयीन मुलाच्या आईवडीलाला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर वैद्यकिय क्षेत्रांत खळबळ उडाली आहे. अटक केलेल्या डॉक्टर आर्वी शहरात प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ आहेत. आरोपी डॉ रेखा कदम अस नाव आहे. त्यांनी एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केला.
मिळालेल्या माहितीनुसार आर्वी शहरातील अल्पवयीन मुलाचे अल्पवयीन मुलींसोबत सूत जुळले.

मुलगा साडे सतरा वर्षाचा आहे.तर मुलगी 13 वर्षाची आहे. यातच दोघाचे सूत जूळल्याने यात मुलीला गर्भधारणा झाली. यात प्रकरणाची वाच्यता होऊ नये म्हणून गर्भपात करण्यात आला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. यावरुन पोलिसांनी रात्रीच रीतसर परवानगी घेऊन लगेचच कार्यवाही करण्याचा हालचाली केल्या. मात्र रात्री घर आणि दवाखाना बंद असल्याने पोलिसांनी रात्रभर पाळत ठेवावी लागली आणि सकाळी महिला डॉक्टरला सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनूले आणि पथकाने अटक केली.

या प्रकरणात पास्को अंतर्गत व बेकायदेशीर ,गर्भपात इतर परवानगी न घेता अल्पवयीन मुलीचा गर्भपात आदी गुन्ह्याची नोंद करण्यात आली.उपविभागीय अधिकारी सुनील सोळुंखे ,पोलीस निरीक्षक भानुदास पिदूरकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली पास्को सेलच्या उपनिरीक्षक जोशना गिरी या घटनेचा तपास करीत आहे.

महिला डॉक्टरने 30 हजारात केला गर्भपात

अल्पवयीन मुलगी ही 5 महिन्याची गर्भवती होती, तिचा गर्भपात करण्यासाठी अल्पवयीन मुलाचे आईवडील आर्वी शहरातील स्त्री रोग तज्ञ डॉ. रेखा कदम यांच्या सोबत 30 हजारात रक्कमेत गर्भपात करण्यात आला आहे. या प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन प्रकरण; विधानभवनात होणार सुनावणी

रेल्वेचं तिकीट १० ते ५० रुपयांनी महागणार!