in

Aryan Khan Bail Hearing Live | आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केलेले नाही- रोहतगी

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या सुनावणीत आर्यन खानची बाजू अॅड मुकूल रोहतगी मांडत आहेत.आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केलेले नाही. तसेच तो बाळगला देखील नाही. मग मागील 20 दिवसांपासून आर्यनला कारागृहात का ठेवण्यात आले आहे, असा सवाल मुकूल रोहतगी यांनी विचारला. तसेच आर्यन खानला चुकीच्या पद्धतीने अटक केले असल्याचे रोहतगी यांनी म्हटले.

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी 20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.

मुकूल रोहतगी यांनी कोर्टात पंचनामा वाचून दाखवला. आर्यन खानवर NDPS च्या 8(c), 20b, 27 आणि कलम 35 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कलामंर्गत गुन्हा सिद्ध झाला तर कमाल 1 वर्षाची शिक्षा दिली जाते. ड्रग्ज पार्टीचा पंचनामा करण्यात आला. मात्र या पंचनाम्यात आर्यन खानचा मोबाईल जप्त केल्याचा उल्लेख नाही असेही ते म्हणाले.

मुकूल रोहतगी यांचा युक्तीवाद संपला, अॅड. अमित देसाई अरबाज मर्चंटच्यावतीने बाजू मांडत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक

Aryan Khan Bail Hearing | आर्यन खानच्या जामीनावर उद्या सुनावणी