in ,

Aryan Khan Drugs Case | अनन्या पांडेची NCBकडून सव्वा दोन तास चौकशी

अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानच्या (Aryan Khan) जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. गेल्या 18 दिवसांपासून आर्यन खान अटकेत आहे. काल (बुधवारी) विशेष एनडीपीएस कोर्टानं त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता.  त्याचबरोबर ड्रग्जबद्दल त्याच्याशी गप्पा मारण्याच्या प्रकरणात चंकी पांडे याची मुलगी अनन्या पांडेचे (Ananya Panday) नावही या प्रकरणात जोडले गेले आहे. 

आज एनसीबीने समन्स बजावल्यानंतर अनन्या वडील चंकी पांडे यांच्यासोबत एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आणि चौकशीला सामोरी गेली आहे. त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास अनन्या एनसीबी कार्यालयातून बाहेर पडली. अनन्याची जवळपास सव्वा दोन तास चौकशी पार पडली. अनन्या पांडेची चौकशी केल्यानंतर तिला उद्या पुन्हा येण्यास सांगण्यात आलं आहे.

खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. सुमारे सव्वा दोन तासाच्या चौकशीनंतर अभिनेत्री अन्यन्या पांडे आणि वडील चंकी पांडे एनसीबी कार्यालयाच्या बाहेर पडले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दिलासादायक : पुण्यात दोन दिवसात एकही कोरोनाबाधित रूग्णाच्या मृत्युची नोंद नाही !

दिवाळीपूर्वीच एसटी कर्मचारी संघटना संपाच्या तयारीत