in

किरण गोसावी विरोधात गुन्हा दाखल; दोन तरुणांच्या फसवणुकीचा आरोप

नमित पाटील, पालघर
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीने किरण गोसावी याला साक्षीदार बनवले आहे. याच किरण गोसावीने परदेशात कामाला लावतो असे सांगून पालघरमधील एडवण येथील दोन तरुणांची फसवणूक करून त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. फसवणूक केल्याप्रकरणी अखेर केळवे सागरी पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर तालुक्यातील एडवण या गावातील उत्कर्ष तरे व आदर्श किणी हे दोन तरुण दोन- तीन वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात असताना किरण गोसावी याची त्यांच्याशी फेसबुक वरून मैत्री झाली. उत्कर्ष व आदर्श यांना मलेशियाला कामाला लावतो असे सांगून दोघांकडून गोसावी याने दीड लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार दोघांनीही गोसावीच्या के.पी. इंटरप्राईज या बँक खात्यात पैसे दिले. नंतर गोसावीने दोघांनाही विमानाचे तिकीट व विजा दिला. कोचीन विमानतळावर पोहोचल्यानंतर विमानाचे तिकीट व विजा बोगस असल्याचे कळाल्यानंतर या दोघांनाही धक्का बसला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या प्रकरणी त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये केळवे पोलिसात दोघांनीही तक्रार अर्ज दाखल केला. मात्र गेल्या दोन वर्षात तत्कालीन पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात स्वारस्य दाखवले नाही.

आर्यन खान प्रकरणात टीव्हीवर सुरू असलेल्या बातम्या पाहून आर्यन सोबत सेल्फीत असलेला व्यक्ती हाच आपली फसवणूक केलेला किरण गोसावी हे तरुणांच्या लक्षात आले.
फसवणूक झालेल्या या तरुणांनी पुन्हा केळवे पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आता याप्रकरणी केळवे पोलीस ठाण्यात किरण गोसावी विरोधात भादविस कलम 420, 406, 465, 467, 471 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केळवे पोलीस गोसावीच्या मागावर असून त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते असे पोलिसांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

48 तासांत अनेक जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा इशारा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, ३ जणांचा मृत्यू