in

Aryan Khan Bail Hearing: एनसीबीकडून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात येत आहे. आर्यनला जामीन मिळणार की त्याच्या कोठडीत वाढ होणार, याचा फैसला काही वेळात होत आहे. मात्र या घटनेत आता एनसीबीकडून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी वाढवून देण्याची मागणी केली जात आहे. अद्याप या प्रकरणी सूनावणी सूरू आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज पार्टी केल्याच्या आरोपावरून शनिवार, २ ऑक्टोबरपासून एनसीबीच्या ताब्यात आहे. आज आर्यनची कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे त्याला आज मुंबईतील न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्यनच्या वकीलांनी पुन्हा एकदा जामीन याचिका दाखल केली होती. मात्र यावर एनसीबीने ११ ऑक्टोंबर पर्यंत कोठडी मागितली आहे. अद्याप या प्रकरणी सुनावणी सुरु आहे.या प्रकरणात आणखी तपास गरजेचा असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. चौकशीच्या आधारावर, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोठडी आवश्यक आहे, असे न्यायालयाने सुनावणी दरम्यान स्पष्ट केले.

मुंबई – गोवा क्रूझवर 2 ऑक्टोबरला धाड टाकून NCB ने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आर्यन खानसह 8 जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर 3 ऑक्टोबरला त्यांना अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर केल्यानंतर (NCB) अटक केल्यानंतर आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

विरारमध्ये तीन तृतीयपंथी नदीत बुडाल्याची घटना; मृतदेहाचा शोध सूरू

११ हजार साईभक्तांनी घेतला साईदर्शनाचा लाभ