in ,

अखेर आर्यन खानची सुटका; २६ दिवस होता तुरुंगात

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची अखेर आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. आर्यन खानसह अन्य दोन आरोपींचा जामीन मंजूर झाल्यानंतर शनिवारी आर्यनची काही तासांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यानंतर आता शाहरुख खान आणि आर्यन खानची मन्नत कडे रवाना झाली आहे.

शनिवारी सकाळी त्याच्या सुटकेची कागदपत्रे जामीन पत्राच्या पेटीत टाकण्यात आली. आर्यन खानला गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. यानंतर शुक्रवारी सत्र न्यायालयात जामीनपत्र भरण्याची कार्यवाही पूर्ण झाली. मात्र, जामिनाची कागदपत्रे मुंबई आर्थर रोड कारागृहातील जामीन पेटीत वेळेवर जमा होऊ शकली नाहीत. त्यामुळे आर्यनची सुटका शनिवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

सुटकेसाठी सुटकेच्या आदेशाची हार्ड कॉपी जेलच्या जामीन पेटीत जमा करावी लागेल. आर्यन खानच्या रिलीझ ऑर्डरची शुक्रवारी संध्याकाळी ५:३५ पर्यंत वाट पाहण्यात आली, पण तो येऊ शकला नाही. त्यामुळे त्याला शनिवारी सोडण्यात येणार आहे असे आर्थर रोड जेलचे अधीक्षक नितीन वायचल यांनी सांगितले होते.

त्यानंतर शनिवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास तुरुंग अधिकाऱ्यांनी आर्थर रोड कारागृहाबाहेर जामीन पेटी उघडली. काल आर्यन खानच्या जामीन सुटण्याच्या आदेशाची प्रतदेखील जामीन पेटीत ठेवण्यात आली होती. त्यानंतर आर्यन खानची आर्थर रोड तुरुंगातून आज सकाळी १० वाजता सुटका होण्याची शक्यता आहे असे तुरुंग अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

आर्यनच्या जामिनासाठी हायकोर्टाने १४ अटी घातल्या आहेत. आर्यन खान पोलिसांना कळवल्याशिवाय मुंबई सोडू शकणार नाही, त्याला दर शुक्रवारी एनसीबीसमोर हजर राहावे लागेल, असे या अटींमध्ये नमूद करण्यात आले आहे. जामीन आदेशानुसार, त्यांना एक लाख रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक जमा करावा लागेल आणि त्यांचा पासपोर्ट जमा करावा लागणार आहे.

कोर्टाच्या अटींनुसार आर्यनला परवानगीशिवाय देश सोडता येणार नाही. तसेच आर्यनला अरबाज मर्चंट आणि या प्रकरणातील आरोपींसारख्या मित्रांशी आणि माध्यमांशीही बोलता येणार नाही. आर्यनला शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजर राहावे लागणार आहे. न्यायालयीन सुनावणीत उपस्थित राहून आवश्यकतेनुसार तपासात सहकार्य करावे लागेल. न्यायालयाच्या आदेशानुसार, यापैकी कोणत्याही अटींचे उल्लंघन झाल्यास, एनसीबीला जामीन रद्द करण्याची विनंती करण्याचा अधिकार असेल.

दरम्यान, आर्यन खानचे मन्नतमध्ये अतिशय भव्य पद्धतीने स्वागत करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत आर्यनच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आणि त्याला आनंद देण्यासाठी शाहरुख खान आणि गौरी यांनी सर्व तयारी केली आहे. शाहरुख खान आणि गौरी खानने मन्नत निळ्या दिव्यांनी सजवला जात आहे.

जुही चावला हमीदार

आर्यनच्या जामिनावरील सुटकेसाठी उच्च न्यायालयाने एक लाख रुपयांचे बंधपत्र तसेच त्याच रकमेचा हमीदार सादर करण्याची अट घातली होती. आर्यनची हमीदार म्हणून अभिनेत्री जुही चावला शुक्रवारी विशेष न्यायालयासमोर हजर झाली. न्यायालयाने तिला साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येण्यास सांगितले. आर्यनचे वडील शाहरुख खान आणि जुहीने चित्रपटांतून एकत्र काम केले असल्याने ती आर्यनला ओळखत असल्याचे त्याचे वकील सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

दोन चिमुकल्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू

विधानसभा निवडणुकीपूर्वीवरब राज्याचा दौरा, आज राहुल गांधी गोवा दैाव्यावर