in

Aryan Khan Bail | आर्यन खानच्या जामीनावर उद्या सुनावणी

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान जामीनावरील सुनावणी पूढे ढकलली आहे. त्यामुळे आर्यन खानला आजची रात्र देखील आर्थर जेलच्या तूरूंगात काढावी लागणार आहे.

आर्यन खान तीन आठवडे उलटून गेले तरी जामीन मिळालेला नाहीये. मंगळवारी त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एकाच पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. आज दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानला बेल मिळणार की पुन्हा जेल होणार याचा फैसला होणार आहे. मात्र आर्यन खान जामीनावरील सुनावणी पूढे ढकलली आहे.त्यामुळे आर्यन खान जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. हायकोर्टात उद्या गुरूवारी 2.30 वाजता सूनावणी होणार आहे.

मंगळवारी त्याच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र एकाच पक्षाची बाजू न्यायालयाने ऐकून घेतली. आज दुसरी बाजू ऐकल्यानंतर आर्यन खानला बेल मिळणार की पुन्हा जेल होणार याचा फैसला होणार आहे. आर्यनच्या बाजूने मुकूल रोहतगी यांनी तब्बल दोन तास युक्तिवाद केला. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक माहिती देतानाच आर्यन खान कसा निर्दोष आहे हे कोर्टासमोर ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. क्रुझवर जाण्यापूर्वीच आर्यन खानला अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली नव्हती, असं रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aryan Khan Bail Hearing Live | आर्यन खानला बेल मिळणार की पुन्हा जेल ? युक्तीवाद सूरू

‘जलयुक्त शिवार योजने’ला क्लीन चिट नाहीच! जलसंधारण विभागाचे स्पष्टीकरण