in

Aryan Khan Bail Hearing | आर्यन खानच्या जामीनावर उद्या सुनावणी

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आता उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे. उद्या दुपारी 2.30 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनला उद्या जामीन मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आर्यन खान जामीन अर्जावरील आजची कारवाई स्थगित करण्यात आली. आता उद्या जामिनावर पुन्हा सुनावणी होणार आहे. दरम्यान आज झालेल्या सुनावणीत आर्यन खानची बाजू मांडत अॅड मुकूल रोहतगी यांनी आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केलेले नाही. तसेच तो बाळगला देखील नाही नसल्याचे म्हटले. मग मागील 20 दिवसांपासून आर्यनला कारागृहात का ठेवण्यात आले आहे, असा सवाल मुकूल रोहतगी यांनी विचारला. तसेच आर्यन खानला चुकीच्या पद्धतीने अटक केले असल्याचे रोहतगी यांनी म्हटले.

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी 20 ऑक्टोबर रोजी एनडीपीएस कायद्याच्या अंतर्गत विशेष न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर आर्यन खानने तातडीच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. नंतर या प्रकरणात आर्यनची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aryan Khan Bail Hearing Live | आर्यन खानने ड्रग्जचे सेवन केलेले नाही- रोहतगी

भाड्याच्या वाहनांवर चौकशी करावी; पप्पू देशमुख यांनी दिल लेखी पत्र