in

राज्यातील आशा वर्कर्स यांचा संप संपला

आशा वर्कर्सच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा झाली आहे. त्यांच्या ज्या मागण्या योग्य आहेत त्या मान्य केल्या आहेत. अखेर राज्यातील आशा वर्कर्स यांचा संप संपला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यातील आशा वर्कर्सने संपाचा इशारा दिला होता. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत आमचा संपर्क सुरुच राहिल, असा निर्णय आशा वर्कर्सने घेऊन राज्यातील 72 हजाराहून अधिक आशा वर्कर कामावर न जाता घरी बसून हा संप करत होत्या.

राज्य सरकार अजिबात आशा कर्मचाऱ्यांबाबत गंभीर दखल घेत नाही. कोरोना काळात कामे करुनही त्यांना कमी मानधन दिले जात आहे. त्यामुळे राज्यभरातील 70 हजार आशा वर्कर आणि 4 हजार गट प्रवर्तक संपाची हाक दिली आहे. या सर्वांनी एकत्रित येत हा संप करण्याचा निर्णय घेतला.

मागण्या काय?

  • कोरोना काळात केंद्र सरकार 33 रुपयांप्रमाणे 1000 रुपये देते तेही वेळेवर नाही. त्यासाठी रोज 300 रुपये मानधन मिळावं.
  • आशा, गट प्रवतर्क महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात बेड राखीव असावेत.
  • आशां ना मास्क, पीपीइ किट, ग्लोव्हज, सॅनिटाइजर पुरेशा प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे सॅनिटायझर, मास्क यांसह सुरक्षेचे साधनं मिळावीत.
  • तब्बल 3 हजाराहून आशा कर्मचाऱ्यांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाला मात्र सरकारकडून विमा किंवा आरोग्य सुविधा दिली जात नाही.
  • अनेक आशांचे आणि कुटुंबियांचे कोरोनात मृत्यू झाले, त्यांनाही सुविधा देण्यात आलेल्या नाही.
  • नियमानुसार 4 तास काम करणे अपेक्षित असताना 12 तास काम करावे लागते.
  • कोरोनासाठी जवळपास सर्व प्रकारची सहाय्यता करावी लागते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Bollywood | शाहरुख-अक्षय एकत्र का काम करत नाही?

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच्या लाहोरमधील घराबाहेर स्फोट