in

महाराष्ट्रात काय पोलीस-पोलीस खेळ सुरू आहे का?, आशिष शेलारांचा घणाघात

सध्या सगळीकडेच कॉर्डेलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरण गाजत आहे. एनसीबीच्या पथकाने मोठ्या शिताफिने कारवाई करत या क्रुझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला. एनसीबीने केलेल्या या कारवाईवर वेगवेगळ्या स्तरांवरून प्रतिक्रीया उमटत आहेत. यात आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्वीट करत महाराष्ट्र पोलिसांवर निशाणा साधला आहे.

तक्रारदारावरच पोलीसांनी गुन्हे दाखल करायचे. अनिल देशमुख प्रकरणात तपास करणाऱ्या सीबीआयच्या अधिकाऱ्याला पोलिसांकडूनच धमक्या दिल्या जाणार. मग माजी गृहमंत्री, माजी आयुक्तांच्या पोलीस अजूनही मागावरच आहे. आता एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा पोलीसांकडून पाठलाग महाराष्ट्रात काय “पोलीस-पोलीस” खेळ सुरु आहे का? असा घणाघात आशिष शेलारांनी केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

देवगड-गिर्ये येथे खडकाला आदळून बोट दुर्घटनाग्रस्त

घटस्फोटानंतर समांथा अक्किनेनीने तोडली चुप्पी