in

सहायक लेखाधिकाऱ्यांनी मागितली घोडसवारीची परवानगी

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील एका लेखाधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना पाठवलेल्या अर्जाची समाज-माध्यमावर आज चर्चा आहे. याने आपल्या पाठीच्या आजाराचे कारण दाखवून कार्यालयात जाता-येताना टु-व्हीलर ऐवजी घोडसवारीची परवानगी मागितली आहे.

कळमनुरी तालुक्यातील घोडे कामठा येथील मूळ रहिवासी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख नाव असून यांचे गाव एकेकाळी जातिवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध होते. ३ मार्चला देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून घोडे खरेदीसाठीची लेखी परवानगी मागितली. मला पाठीच्या कण्याचा त्रास आहे. त्यामुळे दुचाकीवरून प्रवास करणे अवघड जात आहे. त्यामुळे घोडा खरेदी करण्याचे ठरविले असून घोड्यावर बसून विहीत वेळेत कार्यालयात येणे मला शक्य होईन. घोडा आणल्यास त्याला कार्यालयीन परिसरात बांधण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी रितसर केली होती. मात्र, व्हायरल झाल्यानंतर या पत्राची राज्यभर चर्चा झाली. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत देशमुख यांना बोलावून कार्यालयीन समज दिल्यानंतर घोड्यासाठीची मागणी मागे घेत देशमुख यांना बुधवारी सायंकाळी लेखी माफीनामा सादर करावा लागला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

निश्चलनीकरणामुळे बेरोजगारीत वाढ – मनमोहन सिंग

हक्कभंग प्रकरण : अर्णब गोस्वामी फिरसे हाजीर हो…