लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर धन्यवाद प्रस्ताव सादर करत आहेत. राष्ट्रपतींचं भाषण हे 130 कोटी भारतीयांचा संकल्प आहे. राष्ट्रपतींचं भाषण देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. चर्चेत भाग घेणाऱ्या सर्व सदस्यांचा आभार व्यक्त करतो. विशेषत: महिला खासदारांचा आभार व्यक्त करतो. महिला खासदारांच्या भाषणाने सभागृह समृद्ध केलं आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.
भारत आता स्वातंत्र्यांची पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करतो आहे. हा क्षण गर्वाचा आणि पुढे जाण्याच्या पर्वाचा क्षण आहे. भारत हा काही देशांचा महाद्विप आहे, असं शेवटचे ब्रिटीश गव्हर्नर म्हणायचे. याला कुणी एक राष्ट्र करु शकणार नाही असेही म्हणायचे. देशानं तो विचार खोटा ठरवला.
भारताच्या स्वरुपात नवी जागतिक व्यवस्था उदयाला येताना दिसतेय. आपल्याला त्यात आपली जागा शोधायचीय. भारत या जगापासून वेगळा राहू शकत नाही. फक्त लोकसंख्येच्या ताकदीवर आपण जागा बनवू शकत नाही. ती जागा घ्यायची असेल तर आत्मनिर्भर भारत हाच नारा हवा.
कोरोना काळात भारताने एकीच प्रदर्शन दाखवले
कोरोना काळात डॉक्टर, नर्स हे देवाच्या रुपात आले. त्यांच्यामुळेच आपण कोरोनाविरोधात जिंकलो कारण आपले सफाई कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत होते. सफाई कामगारम, रुग्णवाहिकेचा चालक हे देवाच्या रुपात आले होते. . भारताची ओळख बनवण्याची ही संधी आहे. कोरोनानंतरचा काळ भारताला संधी निर्माण करणारा आहे.
आधार, जनधन योजनेचा फायदा
आधार, जनधन योजने अंतर्गत 75 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना रेशन पोहोचवलं. 2 लाख कोटी रुपये लोकांपर्यंत पोहोचवले. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात लोकल फॉर व्होकलचा नारा ऐकायला येतो आहे. आणि जे काही बदल करायचे आहेत, ते याचसाठी व्हायला हवेत. असे ते यावेळी म्हणाले.
नवे कृषी कायदे फायद्याचे
आंदोलन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचा सरकार आदर करतं. हे सभागृह आदर करतं, हे सरकारही करतं. कायदा लागू झाल्यानंतरही कुठेही ना बाजारपेठा बंद झाल्या ना एमएसपी बंद झाली, उलट एमएसपी वाढल्या आहेत. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना फायदाच झाला.
भाषणात अडथळा आणण्याचे विरोधकांचं नियोजन
माझ्या भाषणात अडथळा आणण्याची हे तर विरोधकांचं नियोजन आहे. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांना एक नवा पर्याय मिळाला आहे. शेतकऱ्याला जिथं हवं तिथं विकण्याची संधी मिळाली आहे, भीती घालण्याचं काम आंदोलनजीवी करत आहेत.
घोषणाबाजी नंतर कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग
घोषणाबाजी नंतर कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला आहे. काँग्रेसची दोन्ही सभांमध्ये वेगवेगळी भूमिका आहे इतकी विभागलेली आणि संभ्रमित पार्टी मी कधी पाहिली नाही. सर्वात जुनी पार्टी पण सर्वात संभ्रमित असलेली पार्टी काँग्रेस, मोदींची काँग्रेसवर टीका.
शेतमालाची जुनी पद्धत अजूनही कायम
कृषी ही भारताची अविभाज्य संकृती. शेतमालाची जुनी व्यवस्था संपलेली नाही, ज्यांना हवी ते वापरु शकता. शेतात हवी तेवढी गुंतवणूक होत नाही. वाढत्या लोकसंख्येमुळे शेती क्षेत्रावर परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना नव्या गोष्टी शिकवून कृषी क्षेत्राचा विकास करणार. जनतेसाठी सरकारने पुढाकार घेतला आहे .सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्रदेखील महत्वाचे आहे.
Comments
Loading…