in

पाण्याच्या वादातून सोसायटीच्या सदस्यावर हल्ला

मयुरेश जाधव;अंबरनाथ | सोसायटीच्या पाण्याच्या वादातून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने सोसायटीच्या सदस्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. अंबरनाथ पश्चिमेच्या मोहन सबर्बिया या उच्चभ्रू गृहसंकुलात ही घटना घडलीये.

अंबरनाथ शहरातील मोहन सबर्बिया संकुलात मागील ३ दिवसांपासून पाणी आलेल नसल्यानं रहिवाशांमध्ये संताप होता. त्यातच आज सकाळी पाण्याचा टँकर आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशी राकेश पाटील आणि याच संकुलातील एका सोसायटीचे अध्यक्ष असलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी कृष्णा रसाळ पाटील यांच्यात वाद झाले. यानंतर कृष्णा रसाळ यांनी त्यांची दोन मुले केवल रसाळ आणि आशुतोष रसाळ यांच्यासह मला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याचा आरोप राकेश पाटील यांनी केलाय.या मारहाणीत राकेश पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात संध्याकाळी उशिरापर्यंत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान या हल्ल्याप्रकरणी हल्लेखोर कृष्णा रसाळ आणि त्यांच्या मुलांवर कारवाईची मागणी जखमी राकेश पाटील यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वाहतूक कोंडी सूटणार ? पालघर, मुंबई, ठाण्यासाठी नवीन नियमावली

दसऱ्यानंतर नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा