in

तब्बल 9 लाखांची चोरी करणारे अट्टल चोरटे गजाआड

संदीप गायकवाड | वसई-विरार शहरात घरफोडी, वाहन चोरी करून धुमाकुळ माजवलेल्या एका 8 जणांच्या टोळकिला जेरबंद करण्यास यश आले आहे. या टोळकिकडून 19 गंभीर गुन्ह्याचा उकल करीत 9 लाख 24 हजार 655 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या नेतृत्वाखालील,सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची ही कामगिरी आहे.

वसईतल्या वाढत्या चोरीच्या घटना नियंत्रणात आणण्यासाठी वालीवचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास चौगुले यांच्या नेतृत्वाखाली, वालीव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तैनात करण्यात आले होते. या पथकाने टोळकीचा छडा लावत त्यांना अटक केली. लाला उर्फ नियाजउल्ला अमीमुल्ला चौधरी (वय 24), बाळा उर्फ सिध्देश चव्हाण (वय 20), जमील मुस्तक शेख (वय 23), अकबर बैतुल्ल खान (वय 32), आकाश गोविंद रेड्डी (वय 22), सुरज त्रैलोकिनाथ चौरसिया (वय 20), कैलाश सुरेश शिरसाठ (वय 38), गणेश अरुण पाटील (वय 21) असे अटक सराईत चोरट्याचे नाव असून हे सर्वजण वसई पूर्व पश्चिम भागातील वेगवेगळ्या ठिकाणचे राहणारे आहेत.

या टोळीतील 8 जणांना अटक करून, त्यांचा कसून तपास केला असता एकट्या वालीव पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 19 गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्यात त्यांनी 4 लाख 19 हजार 655 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, मोबाईल, रोख रकम, व 5 लाख 5 हजार किमतीचे वाहन असा एकूण 9 लाख 24 हजार 655 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच या आरोपीनी आणखी कुठे कुठे चोरी केली आहे, याचाही तापास सुरू असल्याची माहिती ही तपास Aधिकारी यांनी दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…तर रेल्वे प्रवाशांना बसणार मोठा भुर्दड

अहमदाबादच्या घटनेची पुनरावृत्ती : मोबाइलवर व्हिडीओ तयार करून नाशिकमध्ये तरुणाची आत्महत्या