in

जुन्या भांडणाचा राग काढत तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

मयूरेश जाधव | अंबरनाथ | किरकोळ वादातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना अंबरनाथच्या गायकवाड पाडा परिसरात घडलीये. याप्रकरणी पोलिसांनी ३ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अंबरनाथच्या गायकवाड पाडा परिसरात राहणारा अमित भोईर हा जीन्सच्या कारखान्यात शिलाईचं काम करतो. दसऱ्याच्या दिवशी अमित आणि त्याचा चुलत भाऊ विनोद हे घराबाहेर उभे असताना तिथे सुमित गोमरे, कुणाल बंगाली आणि प्रदीप उर्फ राजा हे तिघे येऊन दारू पिऊ लागले. त्यामुळे विनोद याने त्यांना कानाखाली मारत तिथून पिटाळून लावलं. यानंतर १७ ऑक्टोबर रोजी अमित हा त्याच्या जीन्सच्या कारखान्यात कामावर जात असताना त्याच्यावर पाळत ठेवून असलेले सुमित गोमरे, कुणाल बंगाली आणि सुमितचा भाऊ बारक्या असे तिघे त्या ठिकाणी आले आणि अमितला आधीच्या भांडणाचा जाब विचारत शिवीगाळ केली. अमितने शिवीगाळ केल्याचा जाब विचारला असता या तिघांनी थेट अमितच्या मानेवर चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अमित याने हात मध्ये आणल्याने हा वार त्याच्या डाव्या हातावर झाला. यानंतर पुन्हा एकदा तिघांनी अमितला पकडून त्याच्या पोटात चॉपरने भोसकलं. त्यामुळे अमितचे अक्षरशः आतडे पोटाबाहेर आले. या घटनेनंतर स्थानिकांनी आरडाओरडा केल्यानं तिन्ही हल्लेखोर तिथून पळून गेले. यानंतर अमित याला उल्हासनगरच्या साई क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या घटनेनंतर अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत. तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्यासोबत आणखी कोणी साथीदार होते का? याचा तपास पोलीस करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फुटबॉलच्या मैदानात प्रेक्षकांचा जल्लोष सुरू असताना कोसळला स्टँड

शिवसेना – राष्ट्रवादी आमदारांमध्ये जलपूजनाचा श्रेयवाद