लोकशाही न्यूज नेटवर्क
संत आणि साधू यांच्यातील भेद सांगताना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी साधूंवर टीका केली आहे. साधू हे नालायक असतात, असे ते म्हणाले. यावर भाजपा आक्रमक झाली आहे. साधूंवर टीका करणारे मंत्री नालायक असल्याचे सांगत त्यांना डच्चू देण्याची मागणी भाजपाने केली आहे.
याबाबत भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. ‘सरसकट सर्व साधू संतांना ‘नालायक’ ठरवून ठाकरे सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आपली लायकी दाखवून दिली आहे. अशा नालायक मंत्र्याला आपल्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची हिम्मत न दाखवणारे मुख्यमंत्री किती हिंदुत्ववादी आहेत, हे जनता बघतेच आहे, असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत हे समाजासाठी समर्पित असतात. ते दिशादर्शक असतात. तर, साधू समाजाला लुबाडणारे असतात. अनेक साधूंनी स्वतःची कोट्यवधी रुपयांची संपत्ती गोळा केली. त्याचे अनेक उदाहरणे पाहायला मिळतील. हिंदू धर्माला बदनाम करणारे जेवढे साधू आहेत, ते नालायक आहेत. या मतावर मी ठाम आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
Comments
Loading…