उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे तीन दलित बहिणींची एक घटना समोर आली आहे. त्यावर आरोप-प्रत्यारोपही होऊ लागले आहेत. अशातच महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या विधानावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर योगी सरकार समर्थ असल्याचे म्हटले आहे.
उन्नाव जिल्ह्यात दोन दलित मुली शेतामध्ये मृतावस्थेत आणि एक गंभीर जखमी अवस्थेत सापडल्या होत्या. जखमी अवस्थेत असलेल्या मुलीला एअरलिफ्ट करून मुंबईत उपचार करण्यासाठी पाठवण्याची विनंती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. पण यावरूनच टीका करताना अतुल भातखळकर यांनी उन्नावच्या दुर्दैवी पीडितांना योग्य उपचार देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार समर्थ आहे, असे म्हटले आहे.
तसेच महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यांनी राज्यातील विजेची वाढीव बिले, कापण्यात येणारी 24 लाख कनेक्शन, अनियमित वीजपुरवठा, 100 युनिटपर्यंत सवलतीचा दर याकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही दिला आहे.
Comments
Loading…