in

सचिनला सल्ला देणाऱ्या शरद पवारांना भाजपाने दिली ‘त्या’ दिवसाची आठवण…

लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतकरी आंदोलनावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरून झालेले ट्विट आणि त्याला बॉलिवूडसह इतर मान्यवरांनी दिलेले उत्तर याच्याभोवतीच सध्याचे राजकारण फिरत आहे. हा देशांतर्गत बाब असल्याची भूमिका अनेकांनी मांडली. त्यात मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर देखील आहे. आपले क्षेत्र सोडून आपले क्षेत्र सोडून इतर क्षेत्राबद्दल भाष्य करताना काळजी घेण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सचिनला दिला होता.

यानंतर मान्यवरांनी सोशल मीडियावर मांडलेली मते त्यांची नसून त्यांचा ‘बोलविता धनी’ दुसराच असल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केला आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याची चौकशी करण्याची घोषणा केली. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळले आहे. भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी ‘आपल्या क्षेत्राबाहेरील विषयात जास्त लुडबूड केली तर अशी ट्रिटमेंट मिळते…’, असे सांगत 2006 सालचा क्रिकेटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाने 2006मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. तत्कालीन बीसीसीआय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान करण्यात येणार होती. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार रिकी पाँटिंग याने शरद पवारांना बोटाने खुणावत ती ट्रॉफी देण्यास सांगितले. तसेच ट्रॉफी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियन फलंदाज डेमियन मार्टिन याने शरद पवार यांना ढकलत काढले होते. त्या घटनेची आठवण अतुल भातखळकर यांनी करून दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कृषी कायद्यांना विरोध; शेतकरी आंदोलन आणखी 7 महिने लांबणार!

hasina begum | 18 वर्षानंतर पाकिस्तानच्या जेलमधून मायदेशी परतलेल्या हसीना बेगम यांचे निधन