in ,

ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर, जळगाव प्रकरणावरून अतुल भातखळकरांची टीका

जळगाव जिल्ह्यातील एका शासकीय वसतिगृहाबद्दलचे वृत्त समोर आले होते. मात्र त्याच्या सखोल चौकशीनंतर हे वृत्त तथ्यहीन असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

जळगावमधील एका शासकीय वसतिगृहात महिलेला आक्षेपार्ह अवस्थेत पोलिसांनी नाचायला लावल्याचे सांगण्यात येत होते. याच्या चौकशीसाठी चार सदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली. या समितीच्या चौकशीनुसार, पोलीस वसतीगृहात आल्याची कुठलीही नोंद नाही. तसेच पोलिसांनी महिलांना कपडे काढून नाचायला लावल्याचा प्रकार आढळला नाही. 20 फेब्रुवारीला एका वसतीगृहातील मनोरंजनाच्या कार्यक्रमात गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने गरब्यासाठी घातलेल्या कपड्यांचा त्रास झाल्याने ते कपडे काढून ठेवले, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधिमंडळात दिली. यावरून अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

जळगाव महिला वसतिगृहाच्या गैरप्रकाराबद्दल राज्याच्या गृहमंत्र्यांनी केलेला खुलासा सुसंस्कृत महाराष्ट्राची मान खाली घालायला लावणारा आहे. हाकला या अकार्यक्षम गृहमंत्र्याला. मी म्हणालोच होतो, ठाकरे मंत्रिमंडळात अनेक शक्ती कपूर आहेत, असे ट्विट त्यांनी केले आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झाले; ‘ग्लोबल फ्रीडम’चा अहवाल

OBC आरक्षणाच्या संरक्षणासाठी राज्य शासनाची सकारात्मक भूमिका