in

संजय राठोडांना तात्काळ अटक करा – अतुल भातखळकर

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेत, याप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत राठोड यांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. या सर्व प्रकरणावर आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

“संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा म्हणजे “टू लिटील, टू लेट” इतक्या उशिराने राजीनामा घेतल्याने मुख्यमंत्र्यांचा सुसंकृतपणाचा बुरखा गळून पडला आहे.अठरा दिवस पुरावे नष्ट करण्याच काम झालं याला जबाबदार कोण ? असा सवाल देखील त्यांनी यावेळी केला. FIR दाखल करून त्याला तात्काळ अटक करा.” असे ट्विट करत अतुल भातखळकर यांनी संजय राठोडांना अटक करण्याची मागणी त्यानी केली आहे.

संजय राठोड यांनी दिलेल्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा स्वीकारणार का ? आणि स्वीकारला तर नवे वनमंत्री कोण होणार या गोष्टीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

What do you think?

-2 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

सुव्रत- सखीच्या आयुष्यात तिसऱ्याचं आगमन … शेअर केली आनंदाची बातमी