in ,

मुख्यमंत्र्यांना चिंता फक्त स्वतःची; मुंबई पाण्याखाली गेली तरी काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थानी असलेल्या कलानगर परिसरात गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात पाणी तुंबल्याचे प्रकार घडत आहेत. पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना मातोश्री परिसरात पाणी तुंबत असल्याने टीका होऊ लागली आहे. त्यावर उपाययोजना म्हणून सांताक्रुझ ते वांद्रे दरम्यान मिठी नदीवर दहा ठिकाणी पूरनियंत्रक झडपा तसेच पाणी उपसा पंप बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल उपस्थित केला आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी असे ब्रीद वाक्य ठाकरे सरकारचे आहे. याच वाक्यला धरून अतुल भातखळकर यांनी, मुख्यमंत्री राहात असलेल्या कलानगरमध्ये यावर्षी पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही. उरलेली मुंबई पाण्याखाली गेली तरी काय! चिंता फक्त “टक्केवारी” ची, स्वतः ची आणि कटुंबाची असे म्हणत खोचक टीका केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

डास चावल्यानं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री रागावले; इंजिनिअरला तत्काळ हटवलं

पुण्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रात कंपनीला आग