पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार यांचे शूटिंग आणि चित्रपट आम्ही बंद पाडू, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. यावरून भाजपाने तीव्र प्रतिक्रिया दिली असून नाना पटोले यांची दादागिरी चालणार नाही, असा थेट इशारा भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
काँग्रेसच्या काळात इंधन दरवाढ झाल्यावर ट्विट करणारे सिनेकलाकार आता मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ होत असताना काहीच का बोलत नाहीत? असा सवाल करून नाना पटोले यांनी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग सिनेमांचे प्रदर्शन बंद पाडू, असे म्हटले होते. त्याला भातखळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
अमिताभ आणि अक्षय कुमार या दोघांनाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. नाना पटोले यांची दादागिरी चालणार नाही, राज्यात मोगलाई खपवून घेणार नाही. काँग्रेसने तसे केल्यास आम्ही त्याविरोधात संघर्ष करू, असे देखील भातखळकर यांनी म्हटले आहे.
Comments
Loading…