in

ऑडी इंडियाकडून ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू

जर्मनीची कार निर्माता कंपनी असलेल्या ऑडीने आज भारतात आपल्या नव्या ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू केली आहे. ऑडी क्यू २ लाख रुपये भरून बूक करता येणार आहे. ऑनलाइन बुकिंग अधिकृत वेबसाइट (www.audi.in) वर तसेच ऑडी इंडिया डीलरशीपद्वारेही बुकिंग करता येईल.

ऑडीने भारतात नव्या ऑडी क्यू ५ साठी बुकिंग सुरू केली. क्यू ५ स्पोर्टी असण्यासोबतच दैनंदिन वापराचा सर्वोत्तम अनुभव प्रदान करेल.ऑडी क्यू ५ ही आकार, अजोड कामगिरी आणि उपकरण सुसज्जतेच्या परिपूर्ण मिलापासाठी ओळखली जाते. या अतिशय यशस्वी मॉडेलचे तेजतर्रार एक्सटेरिअर डिझाइन तिची Q ओळख तसेच क्वॉट्रो डीएनएला अधोरेखित करते.

ऑडी इंडियाचे प्रमुख श्रीयुत बलबीरसिंह धिल्लन म्हणाले, ऑडी क्यू ५ ही आपल्या श्रेणीत अत्याधुनिक वैशिष्ट्ये, आराम आणि व्यवहार्यता यांचा परिपूर्ण संगम आहे. अगदी पहिल्याच नजरेत ऑडी क्यू ५ चे नवे डिझाइन भुरळ पाडते. या श्रेणीतील धुरंधर म्हणून आम्ही आमचे स्थान बळकट राखू,असा आम्हाला विश्वास आहे.

ऑडी क्यू ५ वाहन चालवण्याच्या आपल्या क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह गुणधर्मांसोबत येते, ऑडी क्यू ५ ४८.२६ सेंटीमीटर (आर १९) ५ डबल स्पोक स्टार स्टाइल अलॉय व्हील्स, ऑडी पार्क असिस्ट, कम्फर्ट की सेन्सर नियंत्रित बूट लिडची उघडझाप, एकमेव ऑडीतच उपलब्ध लाखेपासून निर्मित ब्लॅक पियानो इनलेज, ऑडी व्हर्च्युअल कॉकपिट प्लस, बीअँडओ प्रीमियम थ्रीडी साऊंड सिस्टिम आदी वैशिष्ट्ये व सुविधांचा अंतर्भाव आहे.

ऑडी क्यू ५ ही चारही चाकांसाठी डॅम्पिंग नियंत्रित सस्पेन्शनने सुसज्ज आहे. आपल्या २.० लिटरच्या शक्तिशाली टीएफएसआय इंजिनच्या माध्यमातून ऑडी क्यू ५ प्रभावी ऍक्सिलरेशन आणि चपळता दाखवते. तसेच त्यातील क्वॉट्रो ऑल-ड्राइव्ह यंत्रणा कोणत्याही प्रकारच्या रस्त्यांवर अनन्यसाधारण गती आणि दिशात्मक स्थैर्यता आणते. यात सुरक्षितता वाढवण्यासाठी मागील बाजूस २ एअरबॅग्जचाही अंतर्भावासह एकूण ८ एअरबॅग्जचा समावेश करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

खंडाळा साखर कारखान्यावर आमदार मकरंद पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व

Maharashtra Corona | राज्यात २ हजार ७९१ रुग्ण कोरोनामुक्त