in

महाराष्ट्र हादरला! प्रेमविवाह केल्यानं बहिणीची अमानुष हत्या

सचिन बडे : औरंगाबाद | प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमधील लाडगाव येथे घडलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली असून पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं घटना काय? :

औरंगाबाद जिल्ह्यातील लाडगाव शिवारात भावाने सख्या बहिणीची कोयत्याने वार करुन हत्या केली. कारण काय तर प्रेमविवाह का केला?

आरोपी हा मुळचा गोयेगाव येथील आहे. प्रेमविवाह करणाऱ्या बहिणीला भेटण्यासाठी आईसोबत तो रविवारी लाडगावला गेला होता. यावेळी त्यानं रागाच्या भरात कोयत्यानं बहिणीचा गळा चिरुन हत्या केली.दरम्यान, शेजारील काही लोकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतलं असून या घटनेचा तपास पोलीस करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Priyanka Chaturvedi ; शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदींनी दिला ‘या’ पदाचा राजीनामा

नागालॅण्डमधील जवानांच्या गोळीबारात सहा मजुरांसह १४ ठार