in

दोषींना संरक्षण देण्याचं काम सत्ताधारी करत आहेत – किरीट सोमय्या

आज सकाळी भांडुप सनराइज हॉस्पिटल मध्ये आग लागली आहे त्यात 10 जणांचा मृत्यू झाल. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ज्यांच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे त्यांच्यावर कठोर कारवाई ही झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी राकेश वाधवान हे सनराइज हॉस्पिटलचे मालक आहेत. त्यांनीच PMC बँक बुडवली होती. त्यांचे शरद पवार आणि ठाकरे यांचे राकेश वाधवाण यांच्याशी खूप जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच त्यांना लॉकडाऊनच्या काळात महाबळेश्वरला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली होती , अशा दोषींना संरक्षण देण्याचं काम सत्ताधारी करत आहे असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे.

सनराइज हॉस्पिटला लागलेली आगमध्ये ICU मध्ये असणाऱ्या रुग्णाचे धूर जाऊन हे सगळे मृत्यू झाले असल्याची माहिती मला मिळालेली आहे , या एक्सिट सिस्टम या मॉल मध्ये नव्हती आणि फायर OC नव्हती याची परवानगी कोणी दिली होती? हा सर्व कोविडच्या नावावर भ्रष्टाचार केला आहे त्याचा एक नमुना आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले .

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महिला अधिकाऱ्याची आत्महत्या प्रकरण आणखी तापलं

शॉर्ट सर्किट की शॉर्ट मेमरी !