लोकशाही न्यूज नेटवर्क
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर आज ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला. फेमा संबंधीच्या प्रकरणात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या पुण्यातील एबीआयएल कार्यालयावर ईडीने त्यांची चौकशी केली. कारवाईदरम्यान अविनाश भोसले यांच्या मुलगा अमित भोसले यालाही रात्री ईडीने ताब्यात घेतले आहे.
अमित भोसले याला ताब्यात घेतल्यानंतर ईडीचे पथक हे पुण्याहून मुंबईला रवाना झाले आहे. काही दिवसांपासून अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू होती. 6 वर्षांपूर्वीच्या परकीय चलनाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. याआधी नोव्हेंबर महिन्यात देखील ईडीने अविनाश भोसले यांना चौकशी केली होती.
27 नोव्हेंबर 2020 रोजी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी करण्यात आलेली होती.अविनाश भोसले यांची मुलगी स्वप्नाली यांचे राज्याचे सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याशी लग्न केलं आहे. आठवड्यांपूर्वी ईडीने स्वप्नाली यांना देखील या प्रकरणात नोटीस पाठविली होती
Comments
Loading…