in

जागतिक हृदय दिनानिमित्त मुंबई पालिकेकडून आजपासून जनजागृती

जागतिक हृदय दिनानिमित्त हृदयरोग आणि त्याच्याशी संबंधित जोखमीच्या घटकांबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत बुधवारपासून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच असंसर्गजन्य आजारविषयक भ्रमणध्वनी सर्वेक्षण केले जाणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार हृदयरोगामुळे मृत्यू पावणार्‍या व्यक्तींचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या २७ टक्के इतके आहे.

जागतिक हृदय दिनजागतिक हृदय दिनहृदयरोगामुळे २९ टक्के मृत्यू -हृदयरोग संबंधित आजार हे मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१८ च्या आकडेवारीनुसार भारतात या आजारांनी मृत्यू पावणार्‍या व्यक्तिंचे प्रमाण एकूण मृत्यूंच्या २७ टक्के इतके आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणी आकडेवारीनुसार मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २०१९ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी २९ टक्के इतके मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व पक्षघात या तीन आजारांमुळे झाल्याचे निदर्शनास आले आहे. कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तिंपैकी ६४.६ टक्के व्यक्ती असंसर्गजन्य आजाराने बाधित होते, असे निदर्शनास आले आहे.

विविध उपक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना हृदयरोग व पोषक आहाराचे महत्त्व पटवून दिल्यास ते आपल्या जीवनशैलीत आवश्यक सकारात्मक बदल घडवू शकतात. परिणामी, हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते असे महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. असंसर्गजन्य आजार विषयक दूरध्वनीवरून सर्वेक्षण -उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (असंसर्गजन्य रोग कक्ष) डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले की, असंसर्गजन्य आजार व त्याकरीता कारणीभूत जोखमीचे घटक यांचे मूल्यमापन करण्यासाठी जागतिक हृदय दिनाचे औचित्य साधून ‘असंसर्गजन्य आजार (Non Communicable Diseases) विषयक भ्रमणध्वनी सर्वेक्षण’ राबविण्यात येणार आहे.

या मोहीमेदरम्यान नागरिकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधला जाईल. त्यात आहार विषयक सवयी, मधुमेह, उच्च रक्तदाब, तंबाखूसेवन, मद्यपान यांच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातील. वय १८ वर्षे पूर्ण असणार्‍या व्यक्तिंना या सर्वेक्षणात सहभाग घेता येईल. मुंबईकर नागरिकांनी ८०००४००३०२१ या क्रमांकावरून आलेल्या दूरध्वनीला प्रतिसाद देऊन या आरोग्य सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“भाजपा कोणाला तरी फोडायचा प्रयत्न करत आहे”, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Yavatmal Bus | पुराच्या पाण्यात एसटी वाहून गेली; आणखी एक मृतदेह हाती