राज्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे मृतांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. जालना जिल्ह्यातही अशीच परीस्थिती आहे, ही परीस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी व नागरिकांममध्ये त्रिसूत्रीची जनजागृती करण्यासाठी आज यमराज रस्त्यावर उतरले होते.
जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांसह मृतांचा आकडाही वाढत चालला आहे. त्यामुळे काही कडक निर्बंध व लॉकडाउनचा नुकताच निर्णय घेण्यात आला. मात्र तरीही नागरिकांकडून नियमांचे पालन केले जात नाही आहे. नागरिक विनामास्क वावरतांना व सोशल डीस्टन्सिंगचे नियम मोडताना पाहायला मिळाले. त्यामुळं स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती समितीच्या वतीनं जालन्यात आज चक्क यमराजाला रस्त्यावर उतरवण्यात आले. यावेळी चक्क यमराज रुप धारण करून एका व्यक्तीने नागरिकांमध्ये कोरोना नियमांची जनजागृती केली. नागरिकांना मास्क घालणे, सोशल डिस्टन्स पाळा व सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन यमराजने केले. त्यामुळे मृत्युनंतर यमसदनी धाडणाऱ्या यमराजाच्या आवाहनाला तरी नागरिक प्रतिसाद देतील अशी अपेक्षा बाळगूया.
Comments
Loading…